धोपावेतील दारूबंदीसाठीमहिलांनी केला आक्रोश,लहान मुलेही आहारी, गाव बरबाद होण्याची वेळ
गावातील मोठेच लहानांना थंड पेयातून दारू देतात. नववी-दहावीतील मुले दारूच्या मोठ्यांप्रमाणे पार्टी करतात. एका दुकानाबाबत तक्रार केली की दुसरा धंदा सुरू होतो. हे थांबले नाही तर अख्खा गाव बर्बाद होईल. असा आक्रोश धोपावे मच्छिमार समाजातील महिलांनी तहसिलदार आणि पोलीस प्रशासनासमोर केला. पाया पडतो पण गावात संपूर्ण दारूबंदी करा, अशी मागणी या महिलांनी केली आहे.
गुहागर तालुक्यातील धोपावे गावात मच्छिमार समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजातील पुरूष मंडळींचा दारूबंदीला विरोध आहे. घरातील महिलांनी दारूबंदीचा विषय काढला तर पुरूष मंडळी हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. तरी देखील १०-११ महिलांनी हा दबाव धुडकावून गुहागर गाठले. गुहागरच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे आणि पोलीस अधिकारी यांना धोपावेतील दारूची कहाणी ऐकवली.प्रशासनाने लक्ष घालून दारू दुकाने बंद करावेत अशी महिलांनी मागणी केली आहे आता याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे www.konkantoday.com