दापोली तालुक्यातील टांगर येथे आगीत घर जळून खाक
दापोली : तालुक्यातील टांगर येथे आगीत घर जळून खाक झाल्याची घटना दि. 8 रोजी रात्री 9:30 वा. च्या दरम्यान घडली. घराचे सुमारे 16 लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. या आगीचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेची मााहिती मिळताच दि. 9 रोजी दापोली तहसीलदार वैशाली पाटील यांनी घराची पाहणी केली. टांगर येथील खलील निरबाडकर यांचे हे होते. मंडल अधिकारी सुभाष आंजर्लेकर, तलाठी एच.पी. पेठे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.