
गणपतीपुळ्यात एमटीडीसीची रेकॉर्डब्रेक कामगिरी, मे महिन्यात उत्पन्न कोटीत!
कोरोनातील निर्बंध उठल्यानंतर पर्यटनासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवर गर्दी केली होती. त्याचा फायदा पर्यटन व्यवसायाला झाला असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) राज्यातील निवासस्थानापैकी गणपतीपुळेतील निवास व्यवस्थेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. एक कोटी १० लाख रूपयांचे उत्पन्न मे महिन्यात मिळाले आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले. महिनाभरात ४ लाखांहून अधिक पर्यटकांनी पुळ्याला भेट दिल्याचा अंदाज आहे. www.konkantoday.com