
सालदुरे येथे दारुच्या नशेत विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू
दापोली : तालुक्यामधील सालदुरे येथे दारूच्या नशेत विहिरीत पडून संतोष साळवी या 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 6 जून रात्री 8 ते मंगळवार दिनांक 7 जून सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान घडली. ऋषिकेश बांद्रे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार संतोष साळवी हे बांद्रे यांच्या सॉमिलमध्ये साफसफाईच्या कामाला होते. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अति दारू सेवन करून रूमकडे जात असताना तोल जाऊन विहिरीत पडले. यात त्यांचा मृत्यू झाला. आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गोरे करीत आहेत.