‘लग्नाला जातो’ असे सांगून गेलेला रत्नागिरीतील आईस्क्रिम विक्रेता बेपत्ता

रत्नागिरी : नातेवाईकाच्या लग्‍नाला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडलेला परप्रांतीय आईस्क्रिम विक्रेता बेपत्ता झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गुड्डू अमृतलाल निशाद (35, मुळ रा.उत्‍तरप्रदेश सध्या रा.बंदर रोड, रत्नागिरी) असे बेपत्‍ता आईस्क्रिम विक्रेत्याचे नाव आहे. याबाबत त्याच्या सहकार्‍याने शहर पोलिसांना खबर दिली आहे. त्यानुसार, हे दोघेही रत्नागिरी शहर परिसरात फिरते आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय करतात.26 मे रोजी गुड्ड उत्‍तरप्रदेशला आपल्या गावी भावाच्या लग्‍नाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो अद्याप गावी पोहोचलेला नाही तसेच तो पुन्हा रत्नागिरीतही न परतल्याने त्याच्या सहकार्‍याने याबाबत 1 जून रोजी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. गुड्डबाबत माहिती मिळाल्यास शहर पोलिस ठाणे (02352-222333 किंवा 9767088080) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button