
रत्नागिरीतून मुलासह आई बेपत्ता; पोलिसांचे आवाहन
रत्नागिरी : शहरातील पर्याची आळी येथील छाया गेस्ट हाऊसमधून मुलगा आणि त्याची आई बेपत्ता झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना 30 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6.30 वा. घडली आहे. जयश्री दिगंबर आंबेकर (वय 47) आणि नितीश दिगंबर आंबेकर (वय 21, दोन्ही रा. छाया गेस्ट हाऊस, रत्नागिरी) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दिगंबर गणपती आंबेकर (रा. राजापूर) यांनी शहर पोलिस ठाण्यात दि. 26 मे रोजी खबर दिली. त्यानुसार, जयश्री ही पती दिगंबर यांना नेहमी फोन करत असे. परंतु,30 एप्रिल रोजी त्यांनी पत्नीला फोन केला असता तिचा फोन बंद लागला.म्हणून त्यांनी रत्नागिरी ती राहत असलेल्या ठिकाणी आणि इतर नातेवाईकांकडे शोध घेतला असता पत्नी आणि मुलगा आढळून आले नाहीत. या दोघांबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास शहर पोलिस ठाणे (02352-222333 किंवा 9767088080) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.