मोडकळीस आलेल्या शेडच्या बातमीमुळे, रेल्वे प्रशासनाकडून दखल कामाला सुरवात
कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकामधील निवारा शेडची दुरवस्था असल्याची माहिती निसर्गरम्य संगमेश्वर आणि निसर्गरम्य चिपळूण फेसबुक समूहाचे प्रमुख तसेच पत्रकार संदेश जिमन यांनी नुकतीच समाज माध्यमातून निदर्शनास आणली होती. या बातमीचा सकारात्मक परिणाम आज बघायला मिळाला. संबंधित यंत्रणांनी या बातमीत मांडलेली परिस्थिती पाहून त्वरित संगमेश्वर रेल्वे स्थानकात तुटलेली निवारा छत बांधणी सुरू केली आहे.
नेहमीच सामाजिक भान राखून कोकण रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी धडपड करणाऱ्या संदेश जिमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर समस्येचे त्वरित निवारण व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसते.
वास्तविक कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच स्थानकात प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रवासी निवारा शेडबाबत दुर्लक्ष होत आहे. कित्येक ठिकाणी स्थानकात प्लॅटफॉर्मवर शेडच नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. गंभीर दुर्घटनाही संभवू शकते. या आणि इतर समस्येवर कोकण रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी अपेक्षा जिमन यांनी व्यक्त केली.
ज्याप्रमाणे संगमेश्वर रेल्वे स्थानकात असणाऱ्या प्रवासी निवारा शेडच्या तुटलेल्या कौलांबाबत मोजक्या कोकणप्रेमींनी आवाज उठवला, तशाच प्रकारे कोकण रेल्वे प्रवाशांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी पुढे यावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन जिमन यांनी केले आहे.
समस्त कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वे हा जिव्हाळ्याचा विषय आहे. सणासुदीला आणि नियमित कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना आपल्या तिकिटांचा मोबदला सुरक्षेच्या माध्यमातून मिळाला पाहिजे. यासाठी त्यांची एकजूट महत्त्वाची असून संगमेश्वर रेल्वे स्थानकातील समस्या दूर झाली तशा इतर ठिकाणी असणाऱ्या समस्या दूर होतील, असे स्पष्ट मत संदेश जिमन यांनी व्यक्त केले.
www.konkantoday.com