जनता महागाईने होरपळतेय ,मात्र सहाव्या उमेदवारासाठी राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष कोट्यवधी खर्च करणार
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने ३, शिवसेनेने २ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे.या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे. मात्र राज्यसभेत आपलाच विजय होणार असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरणं रंगू लागलं आहे.
या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवले आहे तर भाजपा आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल. काँग्रेसनंही त्यांच्या आमदारांसाठी पंचतारांकित हॉटेल बुक केले आहे. येत्या १० जून रोजी मतदानापर्यंत या आमदारांचा मुक्काम या हॉटेलमध्येच असणार आहे. राज्यसभेचा एक उमेदवार निवडून आणण्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यासाठी पाण्यासारखा पैसाही वाहतोय.
ट्रायडेंट हॉटेलचं एका दिवसाचं भाडे
सुप्रिअर रुम – सिंगल – १८,५०० रुपये तर डबल – २० हजार
प्रिमिअम रुम – सिंगल – २२ हजार तर डबल – २३ हजार ५००
प्रिमिअम ओशन व्ह्यू रूम – सिंगल – २३ हजार ५०० तर डबल २५ हजार
प्रेंसिडेंटल सूट – ३ लाख रुपये
ताज हॉटेलचं एका दिवसाचे भाडे
लग्झरी रुम – २२ हजार रुपये
लग्झरी ग्रॅंड(City View) – २५ हजार रुपये
लग्झरी ग्रॅंड(Sea View) – २७ हजार ५०० रुपये
ताज क्लब रुम – ३२ हजार रुपये
ग्रॅंड लग्झरी रुम – १ लाख ६ हजार रुपये
जर हिशोब केला तर पुढील ३ दिवस हे आमदार हॉटेलमध्ये थांबले तर एका आमदारांमागे हजारो रुपये खर्च होणार आहेत. अशातच महाविकास आघाडीचे १४५, भाजपाचे ११५ आमदारांचा हॉटेल खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं आहे. तर दुसरीकडे लोकांनी निवडून दिलेल्या या आमदारांवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. राज्यसभा निवडणुकीत ५ उमेदवार सहज निवडून येतील. परंतु सहाव्या उमेदवारासाठी राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष कोट्यवधी खर्च करणार आहेत
www.konkantoday.com