जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज इन्स्टिट्यूटचा बारावीचा निकाल यंदाही १०० टक्के

नाणीज : येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशन इन्स्टिट्यूटची इयत्ता बारावीच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम आहे. यंदाही बारावीचा निकाल शंभर टक्के लागला.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज एज्युकेशन इन्स्टिट्यूट या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेने यंदाही उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत, अर्थात बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
वाणिज्य शाखेतून ऋषिकेश रमेश वीर ८४.६७ टक्के गुण मिळवून प्रथम आला. आस्था शैलेंद्र पाथरे ८१. 33 टक्के गुण मिळवून दुसरी आली. अभिषेक भगवान जगताप ७९ टक्के गुण मिळवून तिसरा आला.
विज्ञान शाखेतील विद्यार्थी मनोहर युवराज चव्हाण याने ७४.५० टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळवला. श्रेया राजेश सोनवणे हिने ७४.17 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला. तर पारस प्रदीप चव्हाण ७२ टक्के गुण मिळवून तिसरा आला आहे.
गतवर्षी कोरोना काळातही नियमितपणे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होते. ऑक्टोबरनंतर तीन महिनेच विद्यार्थी विद्यालयात उपस्थित होते. तरीही उत्कृष्ट नियोजन आणि विद्यार्थी व शिक्षकांचे एकत्रितपणे असलेले प्रयत्न यामुळे प्रशालेने यावर्षीही शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. खेड्यापाड्यातील गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण घेता यावे यासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून साकारलेले हे विद्यामंदिर आहे. येथे नाणिजसह दशक्रोशीतील विद्यार्थी पूर्णपणे मोफत शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर बुलढाणा, बीड, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद अशा विविध ठिकाणाहून सुद्धा दूरवरून मुले येथे दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी येतात.
येथे ज्युनिअर केजी ते महाविद्यालयीन शिक्षण हे पूर्णपणे मोफत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यशिक्षण, सांस्कृतिक उपक्रम, खेळ असे नानाविध उपक्रम सातत्याने राबवले जातात.
शाळेची भौतिक सुविधांनी सज्ज असलेली इमारत, क्रीडांगण याचबरोबर विद्यार्थ्यांना संस्थानच्यावतीने मोफत माध्यान्ह भोजन देण्यात येते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना परम वंदनीय जगद्गुरु श्री नरेंद्रचार्यजी महाराज आणि पिठाचे उत्तराधिकारी परम पूज्य कानिफनाथ महाराज यांनी शुभाशिर्वाद दिले आहेत. प्रशालेचे चेअरमन श्री अर्जुन फुले, तसेच मुख्याध्यापिका अबोली पाटील, ज्येष्ठ शिक्षक कीर्तिकुमार भोसलेसह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button