रत्नागिरी कॅरम असोसिएशनच्यावतीने ( रत्नागिरी कॅरम लीग ) आर सी एल सीजन ५ अखिल भारतीय आमंत्रितांची कॅरम स्पर्धा

रत्नागिरी कॅरम असोसिएशनच्यावतीने ( रत्नागिरी कॅरम लीग ) आर सी एल सीजन ५ अखिल भारतीय आमंत्रितांची कॅरम स्पर्धा १५ ते १७ जुलै २०२२ दरम्यान हॉटेल विवेक, रत्नागिरी येथे संपन्न होत आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व अखिल भारतीय कॅरम संघटनेच्या मान्यतेने होणाऱ्या या कॅरम लीग स्पर्धेतील खेळाडूंची निवड प्रक्रिया ५ जून २०२२ रोजी रत्नागिरी येथे पार पडली. एकंदर ८ संघ या लीगमध्ये खेळणार असून प्रत्येक संघात ६ खेळाडू व १ संघ व्यवस्थापकअसणार आहे. राज्य, राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय स्तरावली ५२ खेळाडूंमधून ४० खेळाडूंची निवड करण्यात आली असून रत्नागिरीतील १० प्रमुख खेळाडूंपैकी ८ खेळाडूंनाहि संघात स्थान देण्यात आले आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला त्याच्या गुणवत्तेनुसार या लीगमध्ये खेळण्यासाठी मानधन देण्यात असून त्यांचा प्रवास खर्च, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था व गणवेशाची संपूर्ण जबाबदारी रत्नागिरी कॅरम असोसिएशनने घेतली आहे. जवळपास ५ लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव या लीगमार्फत होणार असून प्रथम विजेत्या संघास १ लाख ७५ हजार, द्वितीय विजेत्या संघास १ लाख ५० हजार तर तृतीय विजेत्या संघास १ लाख २५ हजारांचे ईनाम व प्रत्येकी चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडूस रुपये ५ हजार व चषक देण्यात येईल. याशिवाय प्रत्येक व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅमसाठी रुपये ५००/- देण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदय सामंत यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली तसेच आमदार शेखर निकम यांच्या सहकार्याने रत्नागिरी लीग सीजन ५ संपन्न होत आहे. भविष्यात कॅरम खेळाला अधिक लोकप्रिय करण्यात या अखिल भारतीय स्तरावरील आमंत्रितांच्या स्पर्धेची महत्वाची भूमिका असेल असा जाणकारांचा अंदाज आहे. या स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे. शिवाय सामन्यांचे लाईव्ह अपडेट्स महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध असतील. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रत्नागिरीच्या आर सी एल टिमने कंबर कसली आहे.

रत्नागिरी लीग सीजन ५ मध्ये खेळणारे संघ पुढीलप्रमाणे 

१) वाय सी सी फिनिशर्स : के. रमेशबाबू ( कर्णधार ), अब्दुल रेहमान, राजू भैसारे, यासिन शेख, अनंत गायत्री, दत्ताराम वासावे. आवेश पोमेंडकर ( संघ व्यवस्थापक )
पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाचा आंतर राष्ट्रीय कॅरमपटू के. रमेश बाबूकडे या संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे दिली असून नुकत्याच मुंबई येथिल राष्ट्रीय विजेत्या उत्तर प्रदेशच्या अब्दुल रेहमान व कॅग ( विदर्भचा ) आंतर राष्ट्रीय खेळाडू राजू भैसारे व फार्मात असलेल्या महाराष्ट्राच्या यासिन शेखवर संघाची मदार असेल. अनंत गायत्रीमुळे एक अतिरिक्त पर्यायही या संघाकडे उपलब्ध आहे.
२) यंगस्टर्स : संदीप दिवे ( कर्णधार ), इर्शाद अहमद, पंकज पवार, रहीम खान, दिनेश केदार, अभिजित खेडेकर. सुशील बांदिवडेकर ( संघ व्यवस्थापक )
सध्या फार्मात असलेला व मलेशिया येथे होणाऱ्या विश्व् अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी निवड झालेला संदीप दिवे कर्णधार पदाची धुरा सांभाळणार असून आय. सी. एफ. कप विजेता
विदर्भचा इर्शाद अहमद तसेच जैन इरिगेशनकडून खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या पंकज पवार व रहीम खानमुळे संघ समतोल वाटतो.
३) सिंधुदुर्ग फायटर्स : संजय मांडे ( कर्णधार ), योगेश धोंगडे, अभिजित त्रिपनकर, वी. आकाश, वरूण गोसावी, दीपक वाटेकर. यतिन ठाकूर ( संघ व्यवस्थापक )
महाराष्ट्राचा अनुभवी माजी राष्ट्रीय विजेता संजय मांडे कर्णधारपद सांभाळणार असून ब्लॅक मॅजिक, माजी राष्ट्रीय विजेता जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडे व अभिजित त्रिपनकर व आंतर राष्ट्रीय खेळाडू वी. आकाशमुळे हा संघ विजेतेपदाच्या शर्यतीत असेल.
४) लायबा कॅरम मास्टर्स : संदीप देवरुखकर ( कर्णधार ), विकास धारिया, जुगल किशोर दत्ता, निसार अहमद, प्रकाश गायकवाड, दस्तगीर शेख. मुजफ्फर पांजरी ( संघ व्यवस्थापक ) पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाचा अनुभवी व जिद्दी संदीप देवरुखकर या संघाचा कर्णधार असून सध्या फार्मात असलेल्या विकास धारियाची त्याला साथ लाभणार आहे. शिवाय नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या आसामच्या जुगल दत्त, महाराष्ट्राचा राष्ट्रीय खेळाडू निसार अहमद व एल आय. सी. स्पोर्ट्स बोर्डाच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू प्रकाश गायकवाडमुळे हा संघ विजेतेपदाचा दावेदार होऊ शकेल.
५) ठाणे स्मॅशर्स : के. श्रीनिवास ( कर्णधार ), महम्मद आरिफ, अभिषेक चव्हाण, राहुल सोळंकी, कल्पेश नलावडे, दिनेश पारकर. विनायक वाखणकर ( संघ व्यवस्थापक ) पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाचा आंतर राष्ट्रीय कॅरमपटू के. श्रीनिवास या सांघाची धुरा सांभाळणार असून उत्तर प्रदेशचा महम्मद आरिफ महाराष्ट्राचा अभिषेक चव्हाण व राहुल सोळंकीवर संघाची संपूर्ण मदार असेल. शिवाय आयत्यावेळी महाराष्ट्राच्या कल्पेश नलावडेचा पर्यायही त्यांच्याकडे आहे.
६) व्हिक्टोरियन्स : रियाझ अकबर अली ( कर्णधार ), प्रशांत मोरे, अनिल मुंढे ,गिरीश तांबे, गणेश तावरे, विजय कोंडविलकर. मोहन हजारे ( संघ व्यवस्थापक )
२०१६ व २०१८ विश्व् अजिंक्यपद व विश्व् कप स्पर्धेतील उपविजेता महाराष्ट्राचा रियाझ अकबर अली संघनायक असून या दोनही स्पर्धेत विजयी ठरलेला रिझर्व्ह बँकेचा विश्व् विजेता प्रशांत मोरे संघासाठी महत्वाची भूमिका निभावतील. तर जैन इरिगेशनचा अनुभवी अनिल मुंढे व महाराष्ट्राचा नवोदित गिरीश तांबे व अनुभवी गणेश तावरेमुळे हा संघ स्पर्धेतील मुख्य दावेदार ठरू शकेल. त्यामुळे गतवर्षीचा विजेता व्हिक्टोरियन्सचा संघ पुन्हा या वर्षीही विजेतेपदाला गवसणी घालतो का हि उत्सुकता कॅरम रसिकांमध्ये आहे.
७) सह्याद्री स्ट्रायकर्स : आर. एम. शंकरा ( कर्णधार ), झहीर पाशा, डी. दिल्ली बाबू, अशोक गौर, प्रफुल्ल मोरे, संजय कोंडविलकर. मंदार दळवी ( संघ व्यवस्थापक )
प्रदिर्घ अनुभव असलेला माजी विश्व् विजेता कर्नाटकचा आर. एम. शंकरा या संघाचा कर्णधार असेल. रिझर्व्ह बँकेतर्फे खेळणाऱ्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू झहीर पाशा, तसेच भारतीय आयुर्विमा महामंडळाचा दिल्ली बाबू पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाचा अनुभवी अशोक गौर व नवोदित प्रफुल्ल मोरेमुळे संघाकडे चांगले पर्याय उपलब्ध आहेत.
८) सत्यशोधक स्ट्रायकर्स : योगेश परदेशी ( कर्णधार ), महम्मद घुफ्रान, एल. सूर्यप्रकाश, सय्यद मेहदी हसन, सागर वाघमारे, राहुल भस्मे. अमोल मयेकर ( संघ व्यवस्थापक ) माजी विश्व् विजेता व सर्वात अनुभवी खेळाडू योगेश परदेशीच्या कर्णधारपदाला त्याचाच पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाचा सहकारी महम्मद घुफ्रान साथीला असून रिझर्व्ह बँकेचा एल. सूर्यप्रकाश व महाराष्ट्राच्या सय्यद मेहदी हसन व सागर वाघमारेमुळे हा संघ स्पर्धेत चमत्कार करू शकेल.

         दोन एकेरी व एक दुहेरी किंवा एक एकेरी व दोन दुहेरी पद्धतीने हे सामने खेळविण्यात येणार असून नाणेफेक जिंकणाऱ्या संघाच्या कर्णधाराने याबाबत निर्णय घ्यायचा असल्याने यंदाची रत्नागिरी कॅरम लीग ही कॅरम रसिकांसाठी अधिक रंगतदार होणार असून कॅरम जगतासाठी मेजवानी ठरणार यात कोणतीही शंका नाही असे

अरुण केदार
उपाध्यक्ष, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांनी म्हटले अ‍ाहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button