उक्षी-तरवळ गावात झाले ऑस्करची गोष्ट लघुपटाचे शुटींग


शताक्षी १८ क्रिएशन या बॅनरखाली निर्माते सुधीर घाणेकर यांच्या ऑस्करची गोष्ट या लघुपटाचे शुटींग नुकतेच उक्षी-तरवळ गावात पार पडले. या लघुपटाचे शुटींग संपूर्ण स्मार्टफोनवर करण्यात आले आहे. या लघुपटात उक्षी-तरवळ गावातील तसेच पंचक्रोशीतील स्थानिक कलाकारांना व लहान मुलांना अभिनयाची संधी मिळाली आहे.
ऑस्करची गोष्ट या चित्रपटात अभिनेता, लेखक, दिग्दर्शक व निर्माते सुधीर घाणेकर हे असून त्यांनी आपल्या अनुभवाच्या आणि जिद्दीच्या जोरावर या लघुपटाची जबाबदारी पार पाडली आहे. या लघुपटात थोडक्यात शेतकरी विश्राम आणि त्याचा मुलगा संजय यांची ही गोष्ट असून वडिलांचा कुटुंबासाठी चाललेला संघर्ष व स्वतःच्या शोधापर्यंतचा प्रवास परिस्थिती नसून देखील मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून चाललेली धडपड तसेच लहान मुलांची कल्पनाशक्ती व निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अथांग सागरासारखा आणि खुल्या आकाशासारखा असतो हे यातून प्रदर्शित करण्यात आले आहे. शिवाय या लघुपटात पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा, जीवन जगवा, अवयवदान व शिक्षणाचे महत्व सांगत अंधाराकडून प्रकाशाकडे जाता येते हा संदेश देण्यात आला आहे.
हा चित्रपट विविध राजकीय व आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात सादर केला जाणार आहे. ऑस्करची गोष्ट या संपूर्ण टीमची मेहनत आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे ही कलाकृती तयार झाली असल्याचे अभिनेता, लेखक सुधीर घाणेकर यांनी सांगितले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button