
संगमेश्वर कोळंबे येथील स्टॉपवरदुचाकी बाजूला घेवुन बोलत असलेल्या स्वाराला डंपर चालकाने चिरडल्याची घटना.
संगमेश्वर कोळंबे येथील स्टॉपवर रस्त्याबाहेर दुचाकी बाजूला घेवुन बोलत असलेल्या स्वाराला डंपर चालकाने चिरडल्याची घटना नुकतीच घडली आहे. या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक डंपर घेवून फरार झाला आहे. ही घटना १ वाजण्याच्या सुमारास घडली. मुजीब जाफर सोलकर (५०, कुरधुंडा, मुस्लीम मोहल्ला संगमेश्वर) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तो कोळंबे ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. तोपर्यंत डंपर चालक फरार झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कुरधुंडा, मुस्लीम मोहल्ला येथील बांधव आक्रमक झाले आहेत.सविस्तर वृत्त असे की, मुजीब सोलकर हे कोळंबे येथे रस्त्याच्याबाहेर दुचाकी उभी करून बोलत होते. याच दरम्यान संगमेश्वरच्या दिशेने जाताना डंपर चालकाने सोलकर यांना रस्त्याबाहेर जावून उडवले. एवढंच नव्हे तर अपघातानंतर त्याने डंपर सुसाट वेगाने संगमेश्वरच्या दिशेने पळवला, कोळंबे ग्रामस्थांना याची माहिती मिळताच ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी डंपर चालकाचा पाठलाग केला मात्र तो दिसून आला नाही. नंबर प्लेट नसल्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण होते.