
वीजग्राहकांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा सुखद धक्का
राज्यातील वीजग्राहकांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने सुखद धक्का देत पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी ७ ते ८ टक्के कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी हा निर्णय लागू करण्यात येणार असून यामुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा पडणार नसल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिली.आयोगाच्या निर्णयानुसार, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीजदर १० ते १२ टक्क्यांनी कमी होतील; तर घरगुती विजेकरिता पाच ते सात टक्क्यांनी दर कमी होणार आहेत. शेतीसाठीचे वीजदर एका टक्क्याने कमी करण्यात येणार आहेत.
मुंबईकरांनाही दिलासा
मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीजदर सात ते आठ टक्क्यांनी, तर व्यावसायासाठीचे वीजदर आठ ते नऊ टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर एक ते दोन टक्क्यांनी कमी होतील. मुंबईत बऱ्याच भागांत टाटा आणि अदानी या कंपन्या वीज वितरण करतात. त्यांच्यासाठीही आयोगाने वीजदर कपात सुचविली आहे. त्यानुसार या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर १८ ते २० टक्क्यांनी; तर व्यवसायासाठी विजेचे दर १९ ते २० टक्क्यांनी कमी करण्याचे सुचविण्यात आले आहे. घरगुती वापराचे विजेचे दर कमी होणार आहेत.
www.konkantoday.com