
साडवलीच्या ठाकरे विद्यालयात जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
देवरूख : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव-देवरूख संचलित मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय, साडवलीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाईन इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी विद्यार्थी संघाच्यावतीने ही स्पर्धा 5 जून ते 12 जून या दरम्यान घेतली जाणार आहे. स्पर्धा 8 ते 10 वी च्या सर्व माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आहे.
प्रथम विजेत्या क्रमांकास रोख रूपये दोन हजार, द्वितीय 1 हजार 500, तृतीय क्रमांकास 1 हजार रूपये व तिघांनाही प्रमाणपत्र आणि गुरुवर्य जे.एम.साळुंखे चषक देऊन गौरवले जाणार आहे. स्पर्धेचे नियम व अटी गुगल फॉर्ममध्ये आहेत. प्रथम तीन विजेत्यांना गुरूवर्य जे. एम. साळुंखे यांच्यासमोर वक्तृत्व सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. व्हीडिओ 12 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत https://forms.gle/B2FfCSKtR3yfpYnz5 या लिंकवर अपलोड करावा. स्पर्धेचा निकाल 15 रोजी जाहीर करण्यात येईल.
या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याध्यापक बलवंत नलावडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. गौरव धामणे यांनी केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सुमित खरात (9665698781), संजीव डोंगरे (9404993119) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.