लोटेमाळ येथून पेट्रोल जनरेटरची चोरी
खेड : तालुक्यातील लोटेमाळ येथील साईकृपा कॉम्प्लेक्स इमारतीच्या तळमजल्यावर ठेवलेला पेट्रोल जनरेटर दि. 30 मे रोजी सकाळी 5.10 ते 5.20 वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, अक्षय मंगेश चाळके (वय 26, रा.पिरलोटे नवीन वसाहत, ता.खेड) याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत चाळके याने म्हटले आहे की, दि. 30 मे रोजी सकाळी 5.10 ते 5.20 वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी लोटेमाळ येथील साईकृपा कॉम्प्लेक्स इमारतीच्या तळमजल्यावर ठेवलेला सुमारे 30 हजार रुपये किमतीचा हिमालयन कंपनीचा पेट्रोल जनरेटर तीन चाकी मालवाहू गाडीतून तीन अज्ञात इसमानी चोरून नेला. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसानी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.