रत्नागिरीतील सौ . लक्ष्मी मंदार ढेकणे झी मराठी वाहिनीवरील महा मिनीस्टर कार्यक्रमात रत्नागिरी केंद्राच्या सव्वा लाखाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या

रत्नागिरी जिल्ह्यातील सौ . लक्ष्मी मंदार ढेकणे ( रा . खालची आळी , रत्नागिरी ) या झी मराठी वाहिनीवरील महा मिनीस्टर कार्यक्रमात रत्नागिरी केंद्राच्या सव्वा लाखाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या .झी मराठी कडून महाराष्ट्रातील 10 केंद्रावर निवड प्रक्रिया करण्यात आली . सावरकर नाट्यगृह येथे दि 22.05.2022 रोजी पार पडलेल्या निवड प्रक्रियेमध्ये प्रश्न फेरीत अचूक उत्तरे दिलेल्या वहिनीं मधून नव्वद जणींची चिठ्ठया काढून निवड करण्यात आली . आणि आदेश भावोजींनी या नव्वद जणींना ‘ माहेरपणासाठी मुंबईला या ‘ असे निमंत्रण दिले – 5-5जणीचे 3 ग्रुप करून खेळाद्वारे 10 जणीची निवड झाली आणि या १० जणींमध्ये प्रश्नोत्तर फेरीतून 5 जणी निवडल्या गेल्या . प्रिया मनोरकर , वरदा मुळ्ये , रश्मी गुरव , अपूर्वा पवार व लक्ष्मी ढेकणे . या 5 जणींमध्ये अंतिम सामना रंगला आणि त्यात रत्नागिरी च्या सौ लक्ष्मी मंदार ढेकणे या विजयी होऊन सव्वा लाखाच्या पैठणीच्या व सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या . त्याचे प्रक्षेपण रविवार दिनांक 05 जून रोजी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत झी मराठी वहिनी वर होईल
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button