घाटांमध्ये जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्या; ना. उदय सामंत यांच्या प्रशासनाला सूचना
रत्नागिरी : परशुराम घाटाचे काम 40 टक्के झाले आहे. याठिकाणी जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. आंबा घाटाबाबतही सुरक्षितता बाळगण्याचे आदेश अधिकार्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत दिली. वाशिष्ठी व शीव नदीतील गाळ उपसण्याचे काम नियोजनानुसार झाले आहे. जो गाळ बाहेर काढला आहे, तो परत नदीमध्ये येणार नाही, याची तांत्रिक खबरदारी घेऊनच पाटबंधारे विभागाने ठिकाणे निश्चित केली आहेत. गाळ काढण्यामध्ये नाम फाऊंडेशनने चांगले सहकार्य केले. त्यांची सर्व यंत्रणा असली तरी इंधन शासनाचे होते. चांगल्या पद्धतीने गाळ काढण्याचे काम झाले असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. मिर्या बंधार्याचे काम सुरू असून, बंधार्याची दुरुस्तीही करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.