राजीवडा येथे दुचाकी पार्किंगवरून शेजाऱ्याला मारहाण
रत्नागिरी : पार्किंगच्या ठिकाणी असलेली दुचाकी दुसरीकडे लावल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून
शहरातील राजीवडा येथे शेजार्याला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार 2 जून रोजी रात्री 10 वा. घडली. सैफअली सईद पावसकर (राहणार राजीवडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात फरहाना जमीर सोलकर (वय 35, रा. राजीवडा, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री फिर्यादीचा पती जमीर मुलांना घेऊन दुचाकीवरून फिरायला गेला होता. त्यावेळी सैफअली पावसकरने पार्किंगच्या ठिकाणी असलेली जमीरची दुसरी दुचाकी दुसरीकडे लावून आपली दुचाकी तिथे लावली. याबाबत जमीरने सैफअलीला जाब विचारल्याच्या रागातून त्याने जमीरला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली.