रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे 11 गट तर पंचायत समितीचे 22 गण निश्चित

रत्नागिरी : नव्या रचनेनुसार रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे 11 गट तर पंचायत समितीचे 22 गण निश्चित करण्यात आले आहेत. मिरजोळे, हरचेरी हे जिल्हा परिषद गट नव्या रचनेत बदलले आहेत. नव्या रचनेमुळे खालगाव, झाडगाव (पालिका हद्दीच्या बाहेर), कुवारबाव हे तीन गट नव्याने करण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यात एक गट व दोन गण नव्याने निर्माण झाले आहेत.
नव्या गट, गणांची रचना जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी जाहीर केली आहे. सध्याच्या जाहीर केलेल्या रचनेला दि.8 जूनपर्यंत हरकत घेण्याची मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर हरकत स्वीकारण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांत, तहसीलदार कार्यालयात या रचनेची प्रत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नव्या गट रचनेनुसार क्रमांक 33 च्या वाटद गटामध्ये जयगड, साखरमोहल्ला, कासारी, गुंबद, सत्कोंडी, सैतवडे, जांभारी, नांदीवडे, रिळ, आगरनरळ, गडनरळ, कळझोंडी, वाटद, चाफेरी या ग्रामपंचायती अंतर्गत येणार्‍या गावांचा समावेश आहे. क्रमांक 34 च्या खालगाव गटामध्ये देऊड, चवे, बोंड्ये, राई, खालगाव, चाफे, विल्ये, तरवळ, लाजूळ, उक्षी, रानपाट, ओरी, धामणसे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. क्रमांक 35 च्या कोतवडे गटामध्ये मालगुंड, गणपतीपुळे, वरवडे, निवेंडी, भगवतीनगर, कोतवडे, जांभरूण, खरवते, वेतोशी, नेवरे या ग्रामपंचायती अंतर्गत येणार्‍या गावांचा समावेश आहे.
क्रमांक 36 च्या करबुडे गटात फणसवळे, मजगाव, दांडेआडोम, पिरंदवणे, केळ्ये, काळबादेवी, बसणी, करबुडे, भोके, निवळी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. क्रमांक 37 च्या हातखंबा गटामध्ये हातखंबा, चरवेली, वेळवंड, कापडगाव, पाली, साठरे, कशेळी, खानू, नाणिज, वळके या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. क्रमांक 38 च्या खेडशी गटात खेडशी, पानवल, झरेवाडी, मिरजोळे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. क्रमांक 39च्या झाडगाव म्युनिसिपल हद्दीबाहेर गटात शिरगाव, कासारवेली, मिर्‍या, सडामिर्‍या या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
क्रमांक 40 च्या नाचणे गटात कर्ला, सोमेश्वर, टेंभ्ये, पोमेंडी खुर्द, नाचणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. क्रमांक 41 चा कुवारबाव हा गट नव्याने निर्माण करण्यात आला असून यामध्ये पोमेंडी बुद्रुक, हरचेरी, चांदेराई, चिंद्रवली, कुरतडे, टिके या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. क्रमांक 42 च्या गोळप गटात भाट्ये, फणसोप, तोणदे, कोळंबे, गोळप, चांदोर, निरूळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. क्रमांक 43 च्या पावस गटात पावस, डोर्ले, शिवारआंबेरे, नाखरे, मावळंगे, गावखडी, पूर्णगड, गणेशगुळे, मेर्वी, गावडे आंबेरे या ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.
वाटद गटात जयगड, वाटद या दोन गणांची निर्मिती करण्यात आली आहे. खालगाव गटात खालगाव, ओरी, कोतवडे गटात वरवडे खारवीवाडा, कोतवडे, करबुडे गटात केळ्ये, करबुडे, हातखंबा गटात नाणिज, हातखंबा, खेडशी गटात पडवेवाडी, खेडशी, झाडगाव (पालिकेच्या बाहेर)  गटात साखरतर, झाडगाव (पालिकेच्या बाहेर); नाचणे गटात कर्ला, नाचणे;  कुवारबाव गटात हरचेरी, कुवारबाव; गोळप गटात भाट्ये, गोळप; पावस गटात गावखडी, पावस या गणांची निर्मिती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button