
मास्क लावलात तरच जिल्हा रुग्णालयात एंट्री
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणार्या रुग्णांचे 3 नातेवाईक पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. संपूर्ण राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातही ही संख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे खबरदारीच्या सूचना शासनाने सर्व जिल्हा रुग्णालयांना दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सर्व कर्मचारी वर्गाने मास्क लावण्याच्या सूचना डॉ. संघमित्रा फुले यांनी दिल्या आहेत. तसेच नातेवाईकांनीसुद्धा मास्क लावून रुग्णालयात यावे, असे आवाहन केले आहे.