जिल्हाधिकारी कार्यालय कंपाउंडमध्ये प्रचंड खर्च करून उभारलेला धजस्तंभ ध्वजा विना किती दिवस ठेवणार – ॲड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्य रस्त्यानजिक मोठ्या ध्वजस्तंभावर भव्य तिरंगा आरोहित झाला. त्यासाठी परिसर सुशोभित करण्यात आला. प्रचंड खर्च यासाठी करण्यात आला. मात्र गाजावाज्या करत उभारलेला ध्वजस्तंभ आणि आरोहीत केलेला तिरंगा हा या ध्वजस्तंभावर डौलाने फडकताना दिसत नाही. प्रदीर्घ कालखंड हा ध्वजस्तंभ तिरंग्याविना आहे. एवढा प्रचंड खर्च करून उभारलेली ही व्यवस्था ध्वजाविना आहे. याचे कारण संबंधितांची राष्ट्रध्वजाबाबत असलेली उदासीन भावना म्हणावी का?
केवळ आपल्या बगलबच्यांना भरघोस रकमेचे काम करायला देण्यासाठी भव्य ध्वजस्तंभ त्यावर भव्य तिरंगा अनुषंगिक सुशोभीकरण असा खटाटोप झाला, खर्च झाला, बिल पेड झाली. आता इतक्या उंच तिरंग्याकडे लक्ष कोण देतो असा समज करून घेऊन हा प्रकार घडत नाही ना ? असा संभ्रम मनात निर्माण होतो अशी प्रतिक्रिया ॲड.पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरीमध्ये जनतेचा पैसा खर्च करून उभारलेला ध्वजस्तंभ त्यावर आरोहीत केलेला तिरंगा त्या ठिकाणी आठ दिवसात फडकताना दिसला पाहिजे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन भा.ज.पाने केली आहे. आठ दिवसात ह्या ध्वजस्तंभावर तिरंगा आरोहीत करण्याची व्यवस्था न झाल्यास जाहीर निषेधासाठी रस्त्यावर उतरणे भाग पडेल असा इशारा ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिला.