दागिने पॉलिश करण्याची बतावणी करुन साडेपाच लाख रुपयांना महिलेला दागिने चोरून लुटले

चिपळूण गोवळकोट येथे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने घरी आले व एका महिलेचे दागिने घेऊन पसार झाले.तब्बल साडेपाच लाख रुपयांना चुना लावून हे भामटे चुना लावून पळाले आहेत याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळयाचे सीसी टिव्ही फूटेज हाती लागले आहे.यात हे दोन संशयित भामटे दुचाकीवरुन घाईघाईने पळुन गेल्याचे दिसत आहे.महिलेला दागिने पॉलिश झालेत पाण्यात ठेवले आहेत अर्ध्यातासानंतर बाहेर काढा अशी गोड बोलुन बतावणी करत त्यांनी पलायन केले आहे.
दरम्यान कोकणात याप्रकरणाने चिपळूण तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली आहे. शाबीर शेख यांनी याची तक्रार दाखल केली आहे.मात्र नागरिकांनी या घटनेपासून बोध घेऊन अनोळखी लोकांना घरात प्रवेश न देता सावध राहणे गरजेचे असून हे प्रकार वाढत रत्नागिरी जिल्हयात वाढले अहेत. याप्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button