
जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात मानधनावर भरती
रत्नागिरी दि. 29 : जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी व महिला रुग्णालय, रत्नागिरी येथे वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील मानधनावर पदभरती करण्यात येणार आहे. स्वच्छतासेवेसाठी वर्ग 4 संवर्गातील वॉर्डबॉय/स्वच्छता सेवा रु. 400/- प्रति दिन प्रमाणे देय मानधनावर व वर्ग 3 संवर्गातील अधिपरिचारिका (GNM) रुपये 20 हजार प्रतिमहा प्रमाणे व ANM रुपये 17 हजार प्रतिमहा प्रमाणे देण्यात येणार आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज समन्वयक , कोव्हीड 19, कक्ष , जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे सादर करावेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
www.konkantoday.com