
रायगडची लोकसभा निवडणूक ही भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी आहे -अनंत गीते
रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे निवडणूक रिंगणात आहेत. सुनिल तटकरे यांच्यावर अनंत गीते सडकून टीका करीत आहेत. सुधागड तालुक्यातील परळी येथे झालेल्या प्रचार सभेत अनंत गीते यांनी सुनील तटकरेंवर पुन्हा हल्लाबोल केला.जे कुणाचेच राहिले नाहीत ते जनतेचे काय होणार असे अनंत गीते म्हणाले. ज्या बॅरिस्टर अंतुले यांनी राजकीय जन्म दिला, त्या अंतुले साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या शरद पवार साहेबांनी मान, सन्मान, प्रतिष्ठा, मंत्रीपदे, आमदारकी खासदारकी एवढं सगळं दिलं त्यांच्या पाठीतही खंजीर खुपसला, 2019 ला मी तटकरेंना हद्दपार करणार होतो, मात्र ज्या जयंत पाटील यांनी त्यांची हद्दपारी वाचवली त्या जयंत पाटीलांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना पाठिंबा देणाऱ्या मधुकर पाटील यांच्या पाठीत खंजिर खुपसला. जे या कुणाचेच राहिले नाहीत ते तुमचे जनतेचे काय राहणार असे घणाघाती टीकास्त्र अनंत गीते यांनी परळी सुधागड येथील प्रचार सभेत सुनिल तटकरे यांच्यावर सोडले.अनंत गीते पुढे म्हणाले की रायगडची लोकसभा निवडणूक ही भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी आहे. मागील वेळेला दुर्दैवाने सदाचाराचा पराभव झाला, याच शल्य माझ्यापेक्षा जास्त जनतेच्या मनात आहे. प्रत्येक सभेत माझे उत्स्फूर्त स्वागत व प्रतिसाद मिळतोयwww.konkantoday.com