राजापुरातील स्ट्रीट लाईट अखेर झाल्या सुरू
राजापूर : शहरातील मुख्य रस्त्याच्या कामासह जलवाहिनीच्या कामासाठी खोदकाम करताना स्ट्रीट लाईच्या केबल तोडण्यात आल्याने अनेक स्ट्रीट लाईट बंदस्थितीत होत्या. याबाबत माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आल्या
आहेत. राजापूर शहरातील जवाहर चौक ते चिंचबांध या छ.शिवाजी महाराज मार्गाच्या काँक्रीटीकरणासह जवाहर चौक ते तालीमखाना या मुख्य रस्त्याचे व या रस्त्यालगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे. खलिफे यांच्या इशार्यानंतर येथील लाईट सुरू झाल्या आहेत.