
मिनी ट्रेलरच्या नांगरामध्ये अडकून जखमी झालेल्या तरूणाचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू
चिपळूण तालुक्यातील मांडके गावाच्या हद्दीत कुटल गावाच्या हद्दीत शेतामध्ये मिनी ट्रेलरच्या नांगरामध्ये अडकून जखमी झालेल्या महेंद्र पांडुरंग मोरे या तरूणाचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू झाला. यातील महेंद्र मोरे हे मांडकी गावाच्या हद्दीत कुटल गावात मिनी पॉवर ट्रेलरच्या मदतीने पेरणी व नांगरणी करीत होते.
सकाळी ८.३० च्या सुमाराला एका शेतातील भाताची पेरणी व नांगरणी झाल्याने महेंद्र मोरे हे दुसर्या शेतात पॉवर ट्रेलर नेत असताना शेताच्या बांधावरून पॉवर ट्रेलर खाली उतरत असताना इंजिनच्या लोडमुळे पॉवर ट्रेलरचे हॅण्डल वरच्या बाजूला उचलले गेले म्हणून खाली करण्याकरिता महेंद्र मोरे हे हॅण्डलवर उभे राहून पायाने खालील बाजूस करीत असताना त्यांचे दोन्ही पाय सटकून चालू असलेल्या ट्रेलरच्या नांगरामध्ये ते अडकले व कंबरेपर्यंत मशिनमध्ये ओढले जावुन अडकून राहिले. त्यानंतर ते ट्रेलरसह कलंडले गेले. त्यानंतर आजुबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून वालावलकर रूग्णालय डेरवण येथे दाखल केले असता त्यांचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू झाला. www.konkantoday.com