पत्नीच्या डोळ्याच्या तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात आलेल्या पतीचा हृदयविकाराने मृत्यू
पत्नीच्या डोळ्याची तपासणी करण्याकरिता आलेल्या जनार्दन हरी हिंदळेकर (६८, रा. कारवली, मधलीवाडी, राजापूर) यांचा शासकीय रूग्णालयाच्या आवारात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
यातील जनार्दन हिंदळेकर हे रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनचा कॅम्प असल्याने ३० तारखेला १ वाजता आपल्या पत्नीला घेवून आले होते. पत्नीच्या डोळ्याची तपासणी झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे अपघात विभागासमोर असलेल्या मोकळ्या जागेत आपल्या पत्नी व पुतण्यासह जेवणास बसले असता त्यांच्या छातीत दुखू लागले म्हणून त्यांच्या पत्नी व पुतण्याने रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com