कॅरमपटू आकांक्षा कदमने जिंकली सलग चौथ्यांदा राज्यस्तरावरील स्पर्धा

संगमेश्वर : तालुक्यातील देवडे येथील राष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिने मुंबई येथील राज्यस्तरावरील कॅरम स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावून चौथ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धा विजेतेपद पटकावले आहे. रोटरी क्लब पार्लेश्वर (विले पार्ले) येथे टुर्नांमेंट भरविण्यात आली होती.  तिने मिताली पिंपलळेचा 24-12-0, 21-19-0 असा सहज पराभव करून आणखी एक विजय मिळविला आहे. आकांक्षाने सेमी फायनला राष्ट्रीय विजेती काजलकुमारीला तीन सेटमध्ये पराभूत केले. सेमी फायनलला राष्ट्रीय विजेती निलम घोडगेवर मात करून उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. यापूर्वी आकांक्षाने राज्यस्तरीय पहिली सावंतवाडी, दुसरी दादर जिमखाना व तिसरी बोरिवली आणि सध्याची चौथी स्पर्धा जिंकली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button