
अनुसूचित जाती’साठी उद्योजकता विकास प्रशिक्षण
रत्नागिरी :स्वयंसहाय्यता युवा गटाकरिता व अनुसुचित जातीच्या प्रवर्गासाठी 1 महिना कालावधीचा अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि. 14 जून ते 13 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, रत्नागिरी यांच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या गटांसाठी हे प्रशिक्षण होणार आहे. प्राप्त अर्जातून निवड समितीमार्फत मुलाखती घेऊन 30 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सोमवार दि. 13 जून रोजी या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी शासकीय अध्यापक महाविद्यालय हॉल, जेलरोड, रत्नागिरी येथे उद्योजकता परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास व सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, शासकीय विविध कर्ज योजना – सोयी सवलती आणि कार्यप्रणाली, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योगाची निवड, बाजारपेठ पाहणी, उद्योगा संबंधित कायदे, उत्पादनाच्या किमती व हिशोब पद्धती, प्रकल्प अहवाल, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी, डिजिटल मार्केटिंग तसेच उद्योग वित्तीय व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल याबाबत शासकीय अधिकारी व तज्ज्ञांमार्फत मिार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेण्यासाठी उमेदवार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील, किमान 8 वी पास तसेच 18 ते 45 वयोगटातील असावा. तरी इच्छुक अनुसचित नव उद्योजक युवक – युवतींनी त्वरित प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जेलरोड, रत्नागिरी मो. नं. 9403078767/04022 येथे संपर्क साधावा.




