
कोकण रेल्वेतून प्रवास करणार्या प्रवाशांना लुटणारा सराईत चोरटा जेरबंद.
कोकण मार्गावर रेल्वेमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांसह प्रवाशांचे मोबाईल चोरणार्या सराईत चोरट्यास पेण पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. भगवान तुकाराम महाडीक (रा. कोलाड-रायगड) असे सराईत चोरट्याचे नाव आहे. या संशयित चोरट्याच्या अटकेने रेवल्वेगाड्यातील अन्य चोर्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेण्याचे प्रकार वाढले होते. आसनांवर झोपलेल्या प्रवाशांच्या डोक्याखाली असलेले मोबाईलही चोरट्यांकडून लांबवले जात होते. ठाणे, वडखळ, पेणदरम्यानही रेल्वेगाड्यांमध्ये चोर्यांचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पेण पोलिसांनी चोर्यांचा छडा लावण्यासाठी सापळा रचला होता. या सापळ्यात भगवान महाडिक या सराईत चोरट्यास पेण पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पेण व वडखळ स्थानकात घडलेल्या चोर्यांमध्ये याचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. या दृष्टीने पेण पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.www.konkantoday.com