यूपीएससीत राज्यात प्रथम आलेल्या प्रियंवदाच्या यशानंतर चिपळुणात कौतुकाचा वर्षाव
चिपळूण : यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेत महाराष्ट्रात पहिली आणि भारतात तेरावी आलेल्या प्रियंवदा अशोक म्हाडदळकर हिचे चिपळूणमध्ये कौतुक होत आहे. तिचे वडील अशोक म्हाडदळकर हे कोकण विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून काम करताना रत्नागिरी येथून सेवानिवृत्त झाले व चिपळुणातील विरेश्वर कॉलनी येथे त्यांचे निवासस्थान आहे. दुसर्याच प्रयत्नात तिने हे यश मिळविले आहे. प्रियंवदा हिने मुंबई येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती व्हीजेटीआयमध्ये मुंबई येथे बी. टेक. पूर्ण केले. त्यानंतर बंगळुरू येथील आयआयएमधून एम.बी.ए.ची पदवी संपादन केली. सहा वर्षे तिने इन्व्हेस्टमेंट बँकिंग क्षेत्रात काम केले. लहानपणापासूनच प्रियंवदा हिला आयएएस ऑफिसर होण्याची इच्छा होती. नोकरीनिमित्त अशोक म्हाडदळकर मुंबईमध्ये स्थायिक झाले. त्यामुळे प्रियंवदा हिच्या यशानंतर चिपळुणातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.