
खेडशी येथील बंद घर फोडून लॅपटॉपसह सोन्याचे दागिने लांबवले
रत्नागिरी : खेडशी येथील बंद घर फोडून अज्ञाताने सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण 73 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना 26 मे रोजी रात्री 8 ते 29 मे रोजी दुपारी 12 वा. कालावधीत घडली. याबाबत मनोज गणपत पवार (वय 54, रा. खेडशी, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, ते बाहेरगावी गेले होते. चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजा उघडून 55 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 18 हजार रुपयांचा लॅपटॉप असा एकूण 73 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.




