
काळबादेवी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या वृद्धाचा तोल जाऊन मृत्यू
रत्नागिरी : मासेमारी करण्यासाठी तालुक्यातील काळबादेवी समुद्रात गेलेल्या वृद्धाचा तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला. शंकर गंगाराम कांबळे (वय 59, राहणार काळबादेवी टेमरेवाडी, रत्नागिरी ) असे त्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवार 31 मे रोजी सकाळी 10.30 वा. घडली. याबाबत त्यांचा मुलगा मुकेश शंकर कांबळे (वय 24, रा.काळबादेवी टेमरेवाडी, रत्नागिरी ) याने पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.