संभाजीराजांचा विश्वासघात कोणी केला हे जनतेनेच ठरवावे : ना. रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेला टोला
रत्नागिरी : छत्रपती घराण्यातून संभाजीराजे यांना गतवेळी राष्ट्रपती कोट्यातून सन्मानाने निवडून आणले होते. पंतप्रधानांना याची माहिती मिळाल्यानंतर छत्रपतींचा सन्मान राखण्याचे काम भाजपाने केले आहे. परंतु आता संभाजीराजे यांचा विश्वासघात कोणी केला? हे जनतेने ठरवावे, असा टोला भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रत्नागिरीत शिवसेनेला लगावला. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, अॅड. बाबासाहेब परुळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. ‘भाजपाने छत्रपती संभाजीराजे यांना फसवले’ असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर पलटवार करताना ना. दानवे रत्नागिरीत बोलत होते. भाजपा हा अखिल भारतीय पार्टी आहे. आमची कौंटुंबिक पार्टी नसल्याचा टोलाही शिवसेनेला लगावला.