
यूपीएससी परीक्षेत खेडच्या अक्षय महाडिक, रत्नागिरीच्या चेतन पंदेरे यांचे यश
रत्नागिरी : कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असल्याचे अधोरेखित झाले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (युपीएससी) निकाल नुकताच जाहीर झाला. यात खेडच्या अक्षय महाडिक याने देशात २१२ वा क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत रत्नागिरीच्या चेतन पंदेरे याला 416 व रँकिंग मिळाले आहे. या दोन तरुणांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
अक्षय महाडिक हा खेडच्या ज्ञानदीप विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून त्याच्या यशाबद्दल माहिती मिळताच ज्ञानदीप विद्यालयातर्फे संस्थाचालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी आंनद व्यक्त केला. खेड तालुक्यातील सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या अक्षयची आई नेहा महाडिक खेडमधील नातूनगर येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका असून वडील संजय महाडिक हे कृषी विभागात कार्यरत आहेत. त्याचे मूळगाव दापोली तालुक्यातील माटवण आहे. अक्षय याचे बारावीपर्यंत शिक्षण खेडमध्ये झाले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत रत्नागिरीच्या चेतन पंदेरे या तरुणाने यश मिळवले आहे. या निकालात चेतन पंदेरे याला 416 व रँकिंग मिळाले आहे. पोलिस खात्यात सहायक पोलिस उप निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या नितीन पंदेरे यांचा हा मुलगा आहे.
