
महागाई वाढली! चिपळुणात राष्ट्रवादीच्या महिलांकडून केंद्र शासनाचा निषेध
चिपळूण : वाढती महागाई, इंधन दरवाढ आदी विषयांवरून जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने चिपळुणातील पदाधिकार्यांनी दि. 29 रोजी केंद्र शासनाचा निषेध केला. शहरातील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, गोडेतल, कडधान्ये व अन्य किराणा माल आदींच्या दरात वाढ होऊन महागाई वाढल्याने रविवारी सकाळी आंदोलन
केले. यावेळी चूल पेटवून त्यावर खाद्यपदार्थ शिजवून केंद्र शासनाचा निषेध केला. महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा निकम, माजी जि. प. सदस्या व युवती जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर, शहर अध्यक्षा दीपिका कोतवडेकर, माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, माजी नगरसेविका फैरोजा मोडक, माजी नगरसेविका आदिती देशपांडे आदींसह शंभरहून अधिक महिला आंदोलनात सहभागी झाल्या
होत्या.