तंटामुक्तीच्या बैठकीला का आला नाहीस? अशी विचारणा करणार्‍या भावाला शिगेने मारहाण

चिपळूण : तंटामुक्‍त समितीच्या बैठकीला का आला नाहीस? असा जाब विचारल्याच्या रागातून तालुक्यातील कौंढरताम्हाने येथे भावाला लोखंडी सळईने मारहाण केली. ही घटना 28 मे रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी संजय तानाजी आग्रे (राहणार कौंढरताम्हाने, भुवडवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी विलास आग्रे यांनी चिपळूण पोलिसांत फिर्याद दिली आहे. विलास आग्रे व त्यांचा भाऊ अविनाश हे मुंबईमध्ये जाण्यासाठी तयारी करत होते. यावेळी संजय आग्रे हा मद्य प्राशन करून तेथे आला आणि त्यांना उद्देशून शिवीगाळ करू लागला. यावेळी “तूही तानाजी आग्रे यांचाच मुलगा आहेस. मग तंटामुक्‍त समितीच्या बैठकीला का आला नाहीस?” असा जाब फिर्यादींने विचारला. त्याचा राग येऊन संजय याने जवळची लोखंडी शिग उचलून विलास आग्रे यांना मारहाण केली. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button