जानवळे तेलीवाडी येथे दीड लाखांचे दागिने लांबवले
गुहागर : तालुक्यातील जानवळे तेलीवाडी येथे दरवाजाचे कुलूप फोडून लोखंडी कपाटातील 1 लाख 60 हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत. याबाबतची फिर्याद प्रभावती शंकर तुप्ते (वय 68, राहणार- जानवळे, तेलीवाडी, गुहागर) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुप्ते घरी नसताना अज्ञाताने यांच्या कपाटातील बॅगेमध्ये ठेवलेली 20 हजार रुपये किमतीची सोन्याची माळ, 78 हजार रुपये किमतीच्या दोन बांगड्या, 8 हजार 650 रुपयांच्या कानातील टॉप्स, 13 हजार 150 रुपयांची सोन्याची अंगठी, 10 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, 12 हजार 600 रु. किमतीची सोन्याची चेन, 4 हजार 260 रुपयांचे कानातील रिंग तसेच 8500 रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.