शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके; 6 लाख 14 हजार पुस्तकांची मागणी
रत्नागिरी : नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील अडीच हजार प्राथमिक शाळांमध्ये मोफत पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. त्यासाठी 6 लाख 14 हजार 66 पाठपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. त्या पाठ्यपुस्तक संचापैकी आतापर्यंत 5 लाख 27 हजार 187 पुस्तक संच (85.85 टक्के) शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाले. प्रत्येक तालुकास्तरावरून ती केंद्र प्रमुखांकडे दिली जाणार
आहेत.
येत्या 17 जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा नव्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभाने पुन्हा गजबजणार आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव देखील बारगळला होता. शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तकदिन साजरा करण्यात येणार आहे. 1 ली ते 8 वी मध्ये शिकणा़र्या लाभार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात येणार आहे.
मागणी केलेल्या मराठी व उर्दू माध्यमाचे पुस्तक संचामध्ये रत्नागिरी- मराठी 116141, उर्दू 16957, चिपळूण – मराठी 47954, उर्दू 5230, मंडणगड – मराठी 20897, उर्दू 5031, खेड – मराठी 56298, उर्दू 3182, दापोली – मराठी 33222, उर्दू 9352, गुहागर- मराठी 47168, उर्दु 2834, संगमेश्वर- मराठी 68042, उर्दू 1032, लांजा – 43982, उर्दू 1698, राजापूर- मराठी 60284 , उर्दू 6012 इतके संच आवश्यक आहेत.