कायद्याची बंधने मोडून वर्षभरात पाच जणांनी केले बालविवाह

रत्नागिरी : जिल्ह्यात या वर्षभरात 5 बालविवाह झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधित पालकांवर पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. हे विवाह पार पडल्यानंतर ही बाब महिला व बालविकास विभागाकडे आली. त्यानंतर त्वरित पोलिस ठाण्यात पालकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली. तसेच संबंधित पाचही अल्पवयीन मुलींना 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत आई-वडिलांच्या घरी राहण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाने केल्या आहेत. तसेच पुढील शिक्षणासाठी त्यांचे समूपदेशनही विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button