मुंबईहून मामाच्या गावी आलेल्या तरुणीचे आंघोळ करताना केले व्हिडीओ शुटिंग

राजापूर : मुंबईहून आपल्या मामाच्या गावी आंगले येथे राहण्यास आलेल्या तरुणीच्या बाबतीत विकृत प्रकार घडला. तरुणी आंघोळ करत असताना एका तरुणाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याप्रकरणी अल्पवयीन तरूणाविरोधात राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरूणी आपल्या कुटुंबासह आंगले, शिंदेवाडी येथील मामाच्या घरी उन्हाळी सुट्टीसाठी आली होती. मामाचे घर साधे असून बाथरूमही कमी उंचीचे आहे. गुरुवारी सकाळी पीडित तरुणी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली असता बाथरूमची भिंत आणि छप्पर यांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेतील मोबाईलमध्ये चित्रीकरण होत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने तत्काळ आरडा-ओरड केली असता कुटुंबियांनी तत्काळ धाव घेतली. यावेळी त्यांनी शोधाशोध केली असता एक तरूण लपून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या तरूणाचा मोबाईल तपासला असता मोबाईलच्या रिसायकल बिनमध्ये पीडित तरूणीचे आंघोळ करताना शुटींग केलेले दोन व्हीडीओ आढळून आले. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर त्या तरूणाने व्हीडिओ डिलीट केल्याचे या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button