दुचाकी लांबवणाऱ्यावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : बँकेतून पैसे आणण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन गेला आणि पसार झाल्याची ही घटना 18 मे रोजी दुपारी 3 वा. जयस्तंभ येथे घडली. याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान तांबोळी (रा. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात इम्रान जलाल पावसकर (वय 21, रा. केळ्ये मजगाव, रत्नागिरी) यांनी शुक्रवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, ओएलएक्स ऍपवरील गाडी घेण्यासाठी सलमान तांबोळीने बँकेतून पैसे आणायचे असल्याचे इम्रान पावसकर आणि त्यांचा भाऊ सुफियान यांना सांगितले. त्यावेळी सलमान तांबोळी त्यांची टीव्हीएस कंपनीची दुचाकी घेऊन पसार झाला. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.