सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तारकर्ली जवळ समुद्रात स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना किनाऱ्यापासून काही अंतरावर पर्यटकांची बोट बुडाली
सिंधुदुर्गात मालवण तारकर्लीजवळ समुद्रात पर्यटकांची एक बोट बुडाली असल्याची माहिती समोर येत आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालवण जवळ ही दुर्घटना घडली आहे. या बोटीवर एकूण 20 पर्यटक उपस्थित होते अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. बोट बुडाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आलं आहे. बोट नेमकी कशामुळे बुडाली
या बाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. ‘जय गजानन’ नावाची ही बोट बुडाली आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. या दुर्घटनेत दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतकांमध्ये मुंबई-पुण्यातील पर्यटकांचा समावेश आहे. स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना किनाऱ्यापासून काही अंतरावर बोट बुडाली
घटनास्थळी मदतकार्य करण्यात येत आहे
www.konkantoday.com