
वृद्धेला धडक देऊन फरार झालेल्या सोलापूरच्या कारचालकाला अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी
रत्नागिरी : गणपतीपुळे ते चाफे जाणार्या रस्त्यावर वृध्देला धडक देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार चालकाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
अल्लाउद्दीन पठाण (राहणार सोलापूर) असे कार चालकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी पठाण स्विफ्ट डिझायर (एमएच-13, बीएन-5531) भरधाव वेगाने घेऊन जात होता. धामणसे येथे त्याने रस्त्याने चालत जाणाऱ्या सुलोचना तुकाराम सांबरे (वय 65, रा. सांबरेवाडी धामणसे, रत्नागिरी) यांना धडक दिली. यात वृद्धेचा मृत्यू झाला होता.