मनसोक्त आंबे खा !आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा रत्नागिरीत रंगली

फळांचा राजा असणा-या हापूस आंबा खाण्याची स्पर्धा रत्नागिरीत रंगलीय.रत्नागिरीतील तोणदे या गावात असणा-या हापूस अँग्रो टूरिझम या ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आली.खास बच्चे कंपनीसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती अगदी ५ वर्षापासूनची मुलं या स्पर्धेत सहभागी झाली होती विशेष म्हणजे आंब्याच्या बागेतच ही स्पर्धा घेण्यात आली.जवळपास 25 पेक्षा अधिक मुलं या स्पर्धेत सहभागी झाली होती 5 मिनीटे या स्पर्धेसाठी वेळ दिली गेली होती.आणि या 5 मिनीटात जास्तीत जास्त आंबे खाण्यासाठी मुलांची चढाओढ सुरु झाली. हापूस आंब्यावर येथेच्छ ताव या मुंलांनी मारला.अतिशय वेगळी आणि रंगतदार, ही स्पर्धा पार पडली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button