चरवेली परिसरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या डाक सेवकाला पोलिसांकडून अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी

रत्नागिरी : चरवेली गावात डाक सेवकाने 52 खातेदारांची लाखोंची फसवणूक केली. सचिन शशिकांत पवार (राहणार चरवेली, रत्नागिरी ) असे या डाकसेवकाचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. गणपत सीताराम राणे (वय 57, रा. लांजा, रत्नागिरी ) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. चरवेली येथील पोस्टाच्या शाखेत डाक सेवक पवारने परिसरातील 52 खातेदारांकडून 25 लाख 13 हजार 213 रुपये घेऊन ते खातेदारांच्या खात्यात न भरता अपहार करत फसवणूक केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button