
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी
काही दिवसांपूर्वी शहरानजीकच्या चंपक मैदानाजवळ सुमारे 6 कोटी किमतीच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणार्या दोन संशयितांना न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांना स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते.त्या नंतर त्यांना ग्रामीण पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. महम्मद जाहीर सय्यद महम्मद अत्तार ( 56, मूळ रा.लखनऊ सध्या राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी) आणि हमीब सोलकर (रा.लाला कॉम्प्लेक्स, रत्नागिरी) अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. बुधवारी या दोघांनाही ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी 20 मे पर्यंत पोलिस कोठडीत केली होती. शुक्रवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.