कडवई-चिखली रस्त्याच्या दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित
संगमेश्वर : तालुक्यातील कडवई-चिखली रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी रिक्षा मालक-चालक संघटना कडवई-तुरळ-चिखली यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. 23 मे पासून रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन गुरूवारी संध्याकाळी स्थगित करत असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी आंदोलनकर्त्यांना 23 मे पासून रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले, असे संघटनेच्यावतीने उपाध्यक्ष संदीप चिले यांनी सांगितले.
या आंदोलनाला महाराष्ट्र् नवनिर्माण सेना तसेच सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी सक्रीय पाठिंबा दिला होता. काम सुरू न झाल्यास बांधकाम विभागाविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.