
ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना मी उत्तर देत नाही- उद्धव ठाकरे यांची रामदास कदम यांचेवर जोरदार टीका
रामदास कदम यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा असताना उद्धव ठाकरे यांनी दोन शब्दांमध्ये रामदास कदम यांचा विषय संपवला. बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस का ठेवली?असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही, असे म्हणत त्यांनी रामदास कदम यांच्या आरोपांवर थेट भाष्य केले.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकमान्य टिळक प्रश्न विचारू शकतात. तर आपणच निवडून दिलेल्या सरकारला प्रश्न विचारणाचा अधिकार गमावून बसलो आहोत का. गमावून बसलो असू तर आपण पत्रकार म्हणून घेऊ शकतो का. हाच एक प्रश्न आहे. त्यामुळे पत्रकारांनी दूध का दूध आणि पानी का पानी केलं पाहिजे. अंधभक्त जन्माला आले आहेत. त्यांना दृष्टी देण्याचं काम आपण केलं पाहिजे.




