सीएनजी वाहनधारकांना झालाय डोक्याला ताप, सीएनजी मिळविण्यासाठी भल्या मोठय़ा वाहनांच्या रांगा व पर्यटकांचाही खोळंबा
वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरांमुळे स्वस्तातला पर्याय म्हणून अनेक वाहनधारकांनी सीएनजी वाहनांकडे धाव घेतली सरकारनेही प्रोत्साहन दिल्याने अनेक नामवंत वाहन कंपन्यांनी सीएनजी वाहने बाजारात उतरवली सुरुवातीला सीएनजीचा दर पेट्रोलपेक्षा भरपूर कमी असल्याने अनेक वाहन खरेदीदाराने सीएनजी वाहने घेण्याकडे धाव घेतली रत्नागिरी शहरात अशोका कंपनीच्या वतीने सीएनजी गॅस पुरवठा केला जातो रत्नागिरी जिल्ह्यात अशोका कंपनीचे सीएनजीचे पंप आहेत मात्र गेले काही महिने सीएनजी वाहनधारकांना सीएनजी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ताटकळत उभे राहावे लागत आहे जिल्ह्यात व रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी सीएनजीची टंचाई जाणवत आहे त्यामुळे अनेक वाहनधारक रांगेत उभे असतानाही सीएनजी संपल्याचे दृश्य दिसत आहे त्यातच जिल्ह्यातील अनेक रिक्षाचालकांनी सीएनजी बसवून घेतल्याने अशा रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे परंतु आता सीएनजी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे रिक्षाचालकांना सीएनजी मिळण्यासाठी तीन तीन तास रांगेत उभे राहावे लागत आहे रत्नागिरी शहरात एमआयडीसी येथे असलेल्या अशोकाच्या सीएनजी पंपांवर गेले काही महिने मोठय़ा रांगा लागत आहेत त्यातच कोकणात आलेल्या पर्यटकांची सीएनजी वाहनांची संख्या वाढल्याने अशा पर्यटकांना देखील सीएनजी मिळण्यासाठी रांगेत वेळ खर्ची करावा लागत आहे
गेले काही दिवस एमआयडीसीत असलेल्या पंपावरील वाहनांची रांग अगदी मेनरोड पर्यंत येत आहे मुळात सीएनजी वाहनांमध्ये मर्यादित सीएनजीचा साठा राहत असल्याने लांबच्या प्रवासासाठी जाताना दोन ते तीनवेळा सीएनजी भरावा लागत आहे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सीएनजी पंपांवर ताटकळत रांगा लावाव्या लागल्याचे दृश्य दिसत आहे सुरक्षिततेच्या कारणासाठी वाहनामध्ये सीएनजी भरताना कोणीही प्रवासी बसू शकत नसल्याने वाहनातील प्रवाशांनाही मोठ्या प्रमाणावर ताटकळत उन्हात बसावे लागत आहे
एवढे करूनही आता पूर्वी स्वस्तात असलेल्या सीएनजी दरात बऱ्यापैकी वाढ झाली आहे मुंबई व इतर जिल्ह्याच्या दृष्टीने विचार करता रत्नागिरी जिह्यात अशोका कंपनीच्या सीएनजीचे गॅसचे दर जास्त असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे हे दर जास्त का आहेत याबाबत प्रशासनाकडून कोणताही खुलासा केला जात नाही तसेच पुरवठा विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे सीएनजी ग्राहक ही वाढ सोसत आहेत पेट्रोलपेक्षा सीएनजी स्वस्त असल्याने सीएनजीचे ग्राहक त्यात समाधान मानून घेत आहेत
www.konkantoday.com